Sat, Sept 23, 2023

बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला कोठडी
बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला कोठडी
Published on : 25 May 2023, 5:37 am
अंधेरी, ता. २५ (बातमीदार) : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ट्विट करणाऱ्या श्रीपाद गोरठकर या तरुणाला आझाद मैदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ निरीक्षक भूषण बेळणेकर यांनी सांगितले. मुंबई पोलिसांचे एक अधिकृत ट्विटर हँडल असून या हँडलवर सोमवारी (ता. २२) एका अज्ञात व्यक्तीने एक मेसेज पाठविला होता. त्यात मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी नांदेड येथून श्रीपाद गोरठकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच बॉम्बचा ट्विट पाठविल्याची कबुली दिली होती.