निवडणुका घ्या, म्हणजे कळेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुका घ्या, म्हणजे कळेल
निवडणुका घ्या, म्हणजे कळेल

निवडणुका घ्या, म्हणजे कळेल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः कर्नाटकमध्ये सरकार आले. आता सर्व राज्यांमधून लोक भाजपला सत्तेतून काढणार हे निश्चित आहे. त्यामुळे १४ आणि १९ ची कथा कुणी सांगायची गरज नाही. पाचोळा कोणाचा होणार आहे, हे देशातली जनता ठरवणार आहे. त्यामुळे घाई करू नका. निवडणुका लावा, म्हणजे कळेल तुम्हाला, असा टोला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबवण्यात येत आहे. कल्याण डोंबिवलीमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाना पटोले हे गुरुवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९च्या लाटेमध्ये विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून गेले असे विधान केले होते. त्या विधानाला उत्तर देताना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना घाई न करण्याचा सल्ला दिला. पटोले म्हणाले की,
हे फक्त दहा वर्षांच्या कालावधीत आता लोकांना कळायला लागलेले आहे की या घोषणा, फेकूगिरी, खोटी स्वप्ने दाखवून लोकांचे पोट भरत नाही. लोकांना लुटलं जाते आणि देशांमध्ये जे फक्त घोषणा करून सत्तेत आलेले आहेत, स्वप्न दाखवून आलेले आहेत, त्यांच्यामुळे लोकांचा स्वप्नभंग झालेला आहे.

भाजपच्या डबल इंजिन या संकल्पनेचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, मणिपूरमध्ये या डबल इंजिन सरकारने काय केले? तिथे आदिवसींना मारले जात आहे. ख्रिश्चनांचे चर्च जाळले जात आहे. सत्तेत राहून दुसऱ्या धर्माला मारायचे आणि तिसरा धर्म जिवंत ठेवायचा. महाराष्ट्रात आल्यावर गाय आई आणि गोव्यात गेल्यावर गाय खाई, अशी भाजपच्या नकली हिंदुत्वाची पद्धत आहे. ती लोकांच्या लक्षात आली आहे.

---
कार्यकर्त्यांना सल्ला
महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच मनात तसे नाही, तर जनतेच्या मनात सुद्धा तसे आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड घेते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे. कार्यकर्त्यांना ही माझी विनंती आहे आधी तुमच्या भागातले आमदार निवडून आणा. त्यासाठी लोकांमध्ये जा आणि जास्तीत जास्त आमदार आपापल्या भागातून निवडून आणा, मग काँग्रेसचा मुख्यमंत्री होणारच.
----
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हावे
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले तर सगळे पक्ष उद्घाटनाला जाणार. आपल्या देशात लोकशाहीला मजबूत ठेवण्याचे काम हे संविधानाने केले आहे आणि संविधानामध्ये अधिकार ज्याचे त्याला दिले आहेतत. त्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. संविधानाला संपवण्याचे काम होत असेल तर ज्यांना याबाबत काळजी आहे त्यांनी याचा विरोध केला आहे, असे पटोले म्हणाले.