Mon, Sept 25, 2023

आगीत भंगार गोदाम जळून खाक
आगीत भंगार गोदाम जळून खाक
Published on : 25 May 2023, 4:54 am
भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यातील काटई गाव परिसरात गुरुवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एका भंगार गोदामाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल तीन तासांनंतर यश आले असून घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.