Tue, October 3, 2023

अपहरण करून बेदम मारहाण
अपहरण करून बेदम मारहाण
Published on : 25 May 2023, 5:01 am
ठाणे, ता. २५ (वार्ताहर) : सासऱ्याला फोन केल्याच्या संशयावरून एकाचे अपहरण करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी फिर्यादी बीपीन लालजी करीया (वय ४१) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बीपीन करीया याला भेटण्यासाठी बोलावून त्याचे इनोव्हा कारमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर येऊर येथील आरोपी रसिक बोरीचा याच्या बंगल्यावर अनिल फरिया, रसिक बोरीचा, आजदिर फरीया व बंगल्यावरील दोन इसम अशा पाच जणांनी लाकडी दांड्याने नग्न करून बेदम मारहाण केली. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर वर्तकनगर पोलिस ठाण्यात अपहरण, बेदम मारहाण आणि ठार मारण्याच्या धमकीबाबत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.