मी पाटील आहे, पाटीलच राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी पाटील आहे, पाटीलच राहणार
मी पाटील आहे, पाटीलच राहणार

मी पाटील आहे, पाटीलच राहणार

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी गुरुवारी (ता. २५) रात्री विरारमध्ये तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. गौतमीसोबत महिलांनी डान्स करत, फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला; तर गौतमीला पाटील या नावावरून विरोध होत असताना अशा विरोधाला मी जास्त महत्त्व देणे सोडून दिले आहे. मी पाटील आहे तर पाटील आडनाव लावणारच, असे थेट प्रत्युत्तर तिने विरोध करणाऱ्यांना दिले आहे.
विरारच्या खार्डी गावातील प्रभाकर पाटील यांनी घराच्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमात गुरुवारी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गौतमी पाटील विरारमध्ये प्रथमच आली असल्याने पालघर जिल्ह्यातील तिच्या हजारो चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी आणि नृत्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती. गौतमीचा कार्यक्रम म्हटले की गर्दी, धिंगाणा आलाच; पण विरारमधील कार्यक्रमात मात्र तिच्या प्रत्येक गाण्याला दाद देत, तिच्या गाण्याचा आनंद घेतला आहे.

------------
इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही
गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. तिच्या नृत्यावरून तिला विरोध होत आहे, पण मी आता कोणत्याच विरोधाला महत्त्व देत नाही, कोणी मला काहीही बोलले तरी मी त्याकडे महत्त्व देत नाही. आता मला पाटील नावावरूनही विरोध केला जात आहे, ते नावच लावायचे नाही असे सांगतात. पण मी पाटील आहे तर पाटील आडनाव लावणारच, असे विरारमधील कार्यक्रमात गौतमी पाटीलने सांगितले आहे.