घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटला
घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटला

घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटला

sakal_logo
By

ठाणे, ता. २६ : टॉल्युएन केमिकल घेऊन जाणारा टँकर घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजखाली उलटल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. तीन तास वाहतूक कासवगतीने सुरू होती. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी साधारणपणे पहाटे चार वाजले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. जेएनपीटी येथून गुजरात, सुरत येथे २५ टन वजनाचा केमिकल टँकर घेऊन चालक मोहम्मद साकिर हा घोडबंदर रोडमार्गे निघाला होता. पातलीपाडा ब्रीजजवळ येताच चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर उलटून अपघात झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे १ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, चितळसर पोलिस, शहर वाहतूक पोलिस, एमएमआरडीए कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. अपघात झाल्याने घोडबंदर रोडवरील वाहतूक तीस तास धीम्या गतीने सुरू होती.