धानीवरीतील बाधितांच्या हक्कासाठी मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धानीवरीतील बाधितांच्या हक्कासाठी मोर्चा
धानीवरीतील बाधितांच्या हक्कासाठी मोर्चा

धानीवरीतील बाधितांच्या हक्कासाठी मोर्चा

sakal_logo
By

पालघर, ता. २६ (बातमीदार) : धानिवारी येथील बाधित आदिवासी कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे, डहाणू उपविभागीय अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा, आदिवासींना त्यांच्या घराचा कब्जेवहिवाटीचा जमिनीचा व लागवडीच्या झाडाचा शंभर टक्के मोबदला मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी शुक्रवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला होता.
मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामात डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील प्रकल्प बाधितांना विस्थापित करताना त्यांची राहती घरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. महिलांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. अजूनपर्यंत त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आंदोलन करून संबंधितांना भरपाई मिळावी याची मागणी केली होती; मात्र अजूनपर्यंत यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित बाधितांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील आदिवासी एकता परिषद, आगरी सेना पालघर, जिल्हा बहुजन युवा क्रांती संघटना, अखिल भारतीय वारली समाज आदी १६ सामाजिक संघटनांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.