मुंबईत पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना

मुंबईत पोलिसांवर हल्ल्याच्या तीन घटना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : मुंबईत पोलिसांना मारहाण झाल्याचा तीन घटना गुरुवारी घडल्या. याप्रकरणी देवनार, कुरार व साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

गोवंडी येथील मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर ‘लजीत’ हॉटेलजवळ एक दाम्पत्य रस्त्यावर भांडण करीत असताना महिला पोलिस तेथे पोहोचल्या. त्यावेळी साफिया खान आणि तिच्या पतीने महिला पोलिसांना मारहाण केली. देवनार पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या घटनेत महिला पोलिस शिपाई मनीषा देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून साफिया खानला अटक करण्यात आली. तसेच पती फिरोज खानविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

साकीनाका येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत रॉबीन यल्लपा ऊर्फ सलीम येला याला पोलिस गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यास गेले असता त्याने पोलिसांवर हल्ला केला. याप्रकरणी रॉबीनला अटक करण्यात आली; तर तिसऱ्या घटनेत कुरार परिसरात पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अनिल हिवाळे व शेखर बनसोडे या दोघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. दोघेही वाहनचालक असून, ते कुरार गाव येथे दारू पिऊन रस्त्यावर आरडाओरडा करीत होते. पोलिस शिपाई संतोष सुरनर यांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरनर यांना मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com