कारवाईतील १५०० कोटींचे अमली पदार्थ नष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवाईतील १५०० कोटींचे अमली पदार्थ नष्ट
कारवाईतील १५०० कोटींचे अमली पदार्थ नष्ट

कारवाईतील १५०० कोटींचे अमली पदार्थ नष्ट

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : कारवाईत जप्त केलेल्या १५०० कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी तांत्रिक प्रक्रियेद्वारे नष्ट केले. मुंबई सीमा शुल्क विभागातर्फे नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या संस्थेत या पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. नष्ट केलेल्या अमली पदार्थामध्ये ९ किलो कोकेन आणि १९८ किलो मेथॅम्फेटामाइन यांचा समावेश आहे. हे अमली पदार्थ ऑक्टोबर २०२२ मध्ये वाशी, नवी मुंबईतून महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत जप्त केले होते. कोकेन आणि मेथॅम्फेटामाइनची ही सर्वात मोठी जप्ती होती. अवैध ड्रग मार्केटमध्ये १४७६ कोटी रुपये एवढी अमली पदार्थांची किंमत आहे. रासायनिक प्रक्रियेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जप्त करण्यात आलेले एमडीएमए, मँड्राक्स आणि गांजा या सारखे अमली नष्ट करण्यात आले.