सावरकर जयंतीनिमित्त मुंबईत पदयात्रा

सावरकर जयंतीनिमित्त मुंबईत पदयात्रा

मुंबई, ता. २६ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन २१ मे ते २८ मे दरम्यान करण्यात आले आहे. या सप्ताहाचा समारोप स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी रविवार, २८ मे रोजी दादर येथे होणार आहे. या वेळी भव्य पदयात्रा व प्रकाशोत्सवाचे आयोजन पर्यटन विभाग, सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित रहाणार आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दादर पश्चिम येथील सावरकर सदन येथून स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील स्वा. सावरकरांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा येऊन स्वा. सावरकरांना मानवंदना देईल व त्यानंतर स्वा. सावरकर लिखित ''जयोस्तुते'' गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता होईल. या पदयात्रेला यशस्वी करण्याकरिता पर्यटन विभागा नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com