५६ वर्षीय रुग्णाचे यशस्वी हिप रिप्लेसमेंट

५६ वर्षीय रुग्णाचे यशस्वी हिप रिप्लेसमेंट

नवी मुंबई, ता. २७ : अपघातात हिपला दुखापत झालेल्या नवी मुंबईतील एका ५६ वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी मिनिमली इन्वेसिव्ह या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून नवी मुंबईत प्रथमच ही शस्त्रक्रिया केली गेली आहे.
वासुदेव पाटील एका अपघातात गंभीर जखमी झाले होते. या अपघातात फ्रॅक्चरमुळे त्यांच्या हिपला खूप नुकसान झाले होते. असह्य वेदनांमुळे त्यांना चालतादेखील येत नव्हते; मात्र मेडिकवर रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे हा रुग्ण पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. मेडिकवर हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दीपक गौतम यांच्या नेतृत्वाखाली एका डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील प्रमुख ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधून प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी मिळून हे अत्याधुनिक तंत्रज्ञान नवी मुंबईत आणले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com