वसई, विरारमधील नालेसफाई कामांना वेग

वसई, विरारमधील नालेसफाई कामांना वेग

विरार, ता. २७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका परिसरातील पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. माजी स्थायी समिती सभापती यांनी आज (ता. २७) पालिका अधिकाऱ्यांसह या कामांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या. या वेळी ७८ टक्के पूर्ण झाली आहेत. १० जूनपर्यंत १०० टक्के कामे पूर्ण होतील, असा दावा पालिकेने केला आहे.

वसई-विरार महापालिकेतील नगरसेवकांची मुदत २०२० मध्ये संपली आहे. तेव्हापासून वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. २०२० मध्ये नालेसफाईत केलेली कुचराई आणि बेसुमार अतिक्रमणांमुळे वसई-विरार शहर पाण्याखाली गेले होते. परिणामी महापालिकेवर मोठी नामुष्की ओढवली होती. या संकटाची पुनरावृत्ती होऊ नये व महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या देखरेखीखाली ही कामे होत नसल्याने त्यात पारदर्शकता व काटेकोरपणा नसतो. परिणामी पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढते, असे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या पत्रात म्हटले होते. याची दखल घेत आयुक्त अनिलकुमार पवार यांनी राऊत यांच्या मागील वर्षीच्या सूचनेवर गांभीर्याने विचार केला आहे. या पार्श्वभूमीवरच राऊत यांनी प्रभाग समिती ब अंतर्गत नालेसफाई कामांचा आढावा घेतला व सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत सहायक आयुक्त मनाली शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक भगत, कनिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com