‘प प पाळीचा’वर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

‘प प पाळीचा’वर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

डोंबिवली, ता. २७ (बातमीदार) : पुरोगामी विचार मंच, महाराष्ट्र, महिला आघाडीतर्फे रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण येथे ‘प प पाळीचा’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अनेक तज्ज्ञांनी मासिक पाळीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष बंडू घोडे यांनी या विषयाचे महत्त्व आणि माहिती काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. सुषमा बसवंत यांनी हा कार्यक्रम पुरुषांपर्यंत जाणे का आवश्यक आहे, याबद्दल सांगत संवेदनशील पती, भाऊ, बाप, दीर, मित्र बनण्यासाठी मासिक पाळीची वैज्ञानिक बाजू समजून घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. सचिव शरद लोखंडे यांनी हॅपी टू ब्लीड या जागतिक मोहिमेबद्दल सांगत स्वतःचे अनुभव व्यक्त केले. डॉ. स्वाती ठोंबे यांनी मासिक पाळी म्हणजे काय हे समजावले. तर डॉ. सुलोचना त्रिभुवन यांनी त्याबाबतचे आजार सांगितले. डॉ. संदीप पगारे यांनी मासिक पाळीची सामाजिक बाजू विशद केली. या वेळी सर्वांचे स्वागत सचिव प्रज्ञा चव्हाण आणि नारायण निंबाळकर यांनी केले. चर्चेमध्ये संकल्पना कऱ्हाडे, डॉ. विद्या बाळदकर, प्रा.आशा मेंढे, नंदिनी साळवे यांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन संघटक मंगल मोरे यांनी केले. कैलास गायकवाड यांनी डिजिटल बाजू सांभाळली. मिलिंद वानखेडे, डॉ. श्रद्धा केदार, शगुप्ता खान, प्रिया कदम, आरती लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. मंगल मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com