केडीएमसीच्या पुनर्वापर अभियात ६१७ किलो साहित्य जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमसीच्या पुनर्वापर अभियात ६१७ किलो साहित्य जमा
केडीएमसीच्या पुनर्वापर अभियात ६१७ किलो साहित्य जमा

केडीएमसीच्या पुनर्वापर अभियात ६१७ किलो साहित्य जमा

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : केडीएमसीने उभारलेल्या आर आर आर केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्यां विविध वस्तूंच्या पुनर्वापर करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या अभियान सहा दिवसांत ६१७ किलो वस्तू आणि साहित्य जमा झाले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे ‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान १५ मे ते ५ जून या ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियांनातर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे प्रभाग स्तरावर १० आरआरआर केंद्र (रीड्यूस, रीयूझ आणि रिसायकल) उभारले असून त्याअंतर्गत घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया केली जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने या अभियानांतर्गत सुरू केलेल्या या १० केंद्रांवर कपडे, जुने चप्पल-बूट, पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तू, जुनी खेळणी, दप्तरे आदी सारख्या वस्तू जमा करण्याबाबत महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
प्रभागस्तरावर १० केंद्राचे २० मे रोजी उद्‌घाटन पार पडल्यानंतर अवघ्या ६ दिवसांमध्ये नागरिकांनी घरगुती कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या ६१८ किलो वस्तू व साहित्य स्वयंस्फूर्तीने केंद्रांवर जमा केले आहे. यामध्ये सुस्थितीतील कपडे २४६ किलो, चप्पल व बूट १४३ किलो, प्लास्टिकच्या पुनर्वापर योग्य वस्तू १२७ किलो, जुनी वापरण्यायोग्य पुस्तके १०२ किलो, जुनी खेळणी ३८ नग, दप्तरे २३ नग यांचा समावेश आहे.
.....
...तर केंद्र कायम करणार
घरातील कचरा पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर करण्यासाठी नागरिकही पुढाकार घेत असल्याचे आशावादी चित्र निर्माण होत आहे. आरआरआर केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास केंद्र ही कायमस्वरूपी कार्यरत राहतील, असे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.