सिग्नल यंत्रणेमुळे सूचना फलक झाकले

सिग्नल यंत्रणेमुळे सूचना फलक झाकले

सिग्नल यंत्रणेमुळे सूचना फलक झाकले
मालाड, ता. २७ (बातमीदार) ः दहिसर पूर्व येथील आनंद नगरमध्ये मेट्रो प्राधिकरणाकडून मेट्रो स्थानक परिसरात वाहनांसाठी महत्त्वाच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत; मात्र नुकतेच बदलण्यात आलेल्‍या सिग्‍नल यंत्रणेमुळे हे सूचना फलक झाकले गेले आहेत. त्‍यामुळे वाहनचालकांकडून सूचनांचे उल्‍लंघन होऊन गोंधळ उडत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.
सूर्यदर्शन इमारतीजवळील पदपथावर रिक्षांसाठी ‘फक्त पिकअप आणि ड्रॉप स्थान’ असे सूचना फलक लावले आहे; मात्र सिग्‍नल यंत्रणेमुळे ही सूचना न दिसल्‍याने येथे रिक्षाचालकांच्या रांगा लागत असून इमारतीचे मुख्य प्रवेशद्वारही यामुळे बंद होत आहे. यामुळे रहिवाशांना येथून प्रवास करणे अवघड होत आहे. त्‍यामुळे प्रशासनाने येथील सूचना फलक सामान्यांना दिसतील असे पुन्हा लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या फलकांवर मराठी भाषा वापरावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com