जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहतूक

जलवाहिनीवर भराव टाकून अवजड वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर भराव टाकून त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील पाले येथील गावकऱ्यांनी उघडकीस आणला आहे. याविषयी ते एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामस्थ मनोहर देसाई यांनी सांगितले. एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याच्या घटना गेल्या दोनतीन महिन्यांत वारंवार घडत असतानाच आता हा प्रकार समोर आहे. या अवजड वाहनांमुळे जलवाहिनीस धोका पोहचण्याची शक्यता स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एमआयडीसीमार्फत बारवी धरणातून विविध प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडीदेखील होत असते. काही दिवसांपूर्वीच हेदुटणे गावाजवळ पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. पाईपलाईनला लागून बांधकाम केले गेले असल्याने या पाईपला गंज लागला होता. एमआयडीसीने हे बांधकाम पाडून दुरुस्ती केली. ही घटना ताजी असतानाच आता पाले गावाजवळ अजबच प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मनमानी पद्धतीने प्रकल्पांसाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना मार्ग करून देण्यासाठी पाईपलाईनवर चक्क भराव टाकत रस्ता तयार केला आहे. या अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे भविष्यात या ठिकाणी पाईपलाईनला धोका उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com