बेशिस्त वाहनचालकांना चाप

बेशिस्त वाहनचालकांना चाप

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवलीमध्ये अनेक वेळा बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली असून कल्याण-डोंबिवलीमध्ये बेशिस्त वाहनचालकांना दणका बसला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली अशी तीन वाहतूक पोलिस ठाणी आहेत. शहरात रस्त्यावरून अनेक बेशिस्त वाहनचालक वाहन चालवत असल्याच्या तक्रारी पाहता २४ ते २६ मे या तीन दिवसांत बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.

कल्याण पश्चिम वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणे ४४, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे सहा, कारमध्ये सीट बेल्ट न लावणे नऊ, फ्रंट सीट प्रवासी वाहतूक करणे ८७, काळ्या काचा लावणारे वाहन रीच, ई चलन पेडिंग वसुली ४९ हजार १०० रुपये अशी कारवाई करण्यात आली. कल्याण पूर्व वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणे १८९, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ६८, कारमध्ये सीट बेल्ट न लावणे ७०, फ्रंट सीट प्रवासी वाहतूक करणे २७, काळ्या काचा लावणारे वाहन आठ, ई चलन पेडिंग ७४ हजार ७०० रुपये वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे डोंबिवली वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणे २२, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे १०, कारमध्ये सीट बेल्ट न लावणे चार, फ्रंट सीट प्रवासी वाहतूक करणे ५०, ई चलन पेडिंग ६६ हजार ६०० रुपये वसुली करून कारवाई करण्यात आली.

---------------
वाहनचालकांनी नियमांचे पालन करत वाहन चालवावे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिस ई चलनमार्फत दंड वसुली करते. ती थकबाकी असल्यास ती जवळच्या वाहतूक पोलिस ठाण्यात जाऊन भरावी; अन्यथा न्यायालयीन नोटीस देऊन वाहनचालकांना न्यायालयात हजर राहावे लागले.
- रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण पूर्व वाहतूक पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com