हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्याला अटक

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्याला अटक

ठाणे, ता. २७ (वार्ताहर) : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून राहणाऱ्या एका २७ वर्षीय आरोपीला ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. विलास वसंत काकडे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे पोलिस उपयुक्त परिमंडळ ५ वागळे इस्टेट यांनी विलास काकडे याला ठाणे, बृहमुंबई, रायगड व पालघर या जिल्ह्यांच्या महसूल हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते; मात्र आरोपी विलास काकडे हा २६ मे २०२३ रोजी ठाण्यातील मानपाडा येथे कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या पथकास आढळून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com