अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी ‘पोक्सो’नुसार कारवाईची मागणी

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी ‘पोक्सो’नुसार कारवाईची मागणी

मुंबई, ता. २७ ः भांडुपमधील अल्पवयीन मुलीला तिच्याच परिसरातील एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्यांवरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशा मागणीसाठी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (ता. २७) रात्री शिष्टमंडळासह पोलिस आयुक्तांची भेट घेतली. अशा घटना टाळण्यासाठी पोलिस खात्याने योग्य तो अहवाल गृह खात्याकडे पाठवून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याबाबत आग्रह करावा, अशी विनंती त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हेगाराला अटक झाली असली तरी त्याला मदत करणारे त्याचे आई-वडील व अन्य नातलग मोकळेच आहेत. त्यामुळे त्या सर्वांवर पोक्सो कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी लोढा यांनी निवेदनाद्वारे केली आहे. धर्मांध प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून महाराष्ट्रात अशी प्रकरणे घडवून आणली जात आहेत. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याबाबत आग्रह करावा, अशी विनंती लोढा यांनी आयुक्तांना केली आहे. त्याबाबत कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास मुंबईतील मातृशक्तीला नाइलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com