महानिर्मितीचा ४.२ मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित

महानिर्मितीचा ४.२ मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारने जून २०१७ मध्ये महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरू केली. याअंतर्गत ४.२ मेगावॉटचा सोनगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील सौरऊर्जा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे. सौरप्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना फायदा होणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाचा सोनगाव, राजळे, साठे फाटा आणि सराडे या गावांतील सुमारे १७०० कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/२२ के. व्ही. राजळे उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १६ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई. ई. एस. एल. (विकसक), मे. टाटा (सब व्हेंडर) आहेत.

आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३७१.६२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर १० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौरऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे ३.३० रुपये प्रतियुनिट दराने मिळणार असून महावितरणसमवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.


सांगली, कोल्हापुरातील प्रकल्प कार्यान्वित होणार
आगामी जून महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी (जि. सांगली) येथील २ मेगावॉट, कुंभोज (जि. कोल्हापूर) येथील ४.४ मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. १०० मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पासाठी विकसकाला इरादा पत्र देण्यात आले आहे. तसेच ४०० मेगावॉटचे इरादा पत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता सुमारे १ हजार मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून यासाठी महानिर्मिती युद्धपातळीवर काम करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com