आरोपिची पोलिस निरीक्षकाला धक्काबुकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोपिची पोलिस निरीक्षकाला धक्काबुकी
आरोपिची पोलिस निरीक्षकाला धक्काबुकी

आरोपिची पोलिस निरीक्षकाला धक्काबुकी

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) : चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलेल्या एका व्यक्तीने चक्क पोलिस ठाण्यातच वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह मध्यस्थी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुकी केली. हा प्रकार गुरुवारी (ता. २४) तुळिंज पोलिस ठाण्यात घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या शशिकांत बालाजी गुजराती याला वॉरंट बजावण्यासाठी तुळिंज पोलिस त्याच्या घरी गेले होते. त्या वेळी त्याने सहायक पोलिस उपनिरीक्षकांना शिविगाळ करून त्यांच्यासोबत उद्घट वर्तन केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तुळिंज पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्यासमोर उभे केले. त्या वेळी गुजराती याने सहायक पोलिस उपनिरीक्षक हिरालाल तडवी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्याशी वाद घातला. आरोपीने पोलिसांच्या सरकारी गणवेशाच्या शर्टाची बटणे व खांद्यावरील ताऱ्यांची पट्टी तोडून त्याचे नुकसान केले असल्याचे समोर आले आहे. पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला बाजूला सारून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

---------------
नावरा-बायकोच्या वादातील खावटीचे समन्स बजावण्यासाठी आमचे पोलिस गुजराती या आरोपीकडे गेले होते. तो मनोरुग्ण आहे. प्रत्येकासोबत तो वाद घालत असतो. त्याच मनोरुग्ण अवस्थेतून त्याने गुरुवारी माझ्या कॅबिनमध्येही गोंधळ घातला. आम्ही त्याला तात्काळ ताब्यात घेऊन, त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
- शैलेंद्र नगरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुळिंज