समाज विकास क्रांती पक्ष नव्याने निवडणुकीच्या रिंगणात

समाज विकास क्रांती पक्ष नव्याने निवडणुकीच्या रिंगणात

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः आगामी निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केली आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या समाज विकास क्रांती पक्षाचे प्रमुख अशोक सिंग यांनी त्यांच्या भांडुप येथील मुख्य कार्यालयात स्वागत समारंभ कार्यक्रमात समाज विकास क्रांती पक्ष नव्याने निवडणुकीच्या रिंगणात ताकदीने उतरणार असल्याचे भाष्य केले.
पक्षाच्या मुख्य कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी सिंग यांनी पक्षाची निवडणुकीतील ध्येय-धोरणे व वाटचाल कशी असेल, याबाबत सूतोवाच करत पक्ष मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरेल; तसेच कार्यकर्त्यांना मोठ्या उत्साहाने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रमुख अशोक सिंग, शीला सिंग, विश्वस्त चंदन सिंग, सागर सिंग, व्यवस्थापक शालिनी सिंग, रागिणी सिंग, प्राचार्या मोनिका यादव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उद्योजक असलेले अशोक सिंग यांनी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूकही लढवली आहे. अनेक समाजोपयोगी कामे करताना त्यांनी समाज विकास क्रांती पक्षाची स्थापना केली असून या राजकीय पक्षाने येत्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com