नवी मुंबईत पाच शाळा बेकायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत पाच शाळा बेकायदा
नवी मुंबईत पाच शाळा बेकायदा

नवी मुंबईत पाच शाळा बेकायदा

sakal_logo
By

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शहरातील पाच शाळा बेकायदा
असल्याचे जाहीर केले आहे. या पाचही शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून दरवर्षी मार्चमध्ये शाळांची यादी जाहीर केली जात असताना यंदा मे महिन्यात ही यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
मराठीपेक्षा इंग्रजी, सीबीएसई अशा शाळांकडे सध्या पालकांचा कल आहे. त्यामुळे आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घ्यावे, असा आग्रह असल्याने दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन नवी मुंबई शहरात इंग्रजी माध्यमाच्या बेकायदा शाळांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी १० बेकायदा शाळा होत्या. त्यापैकी ७ शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या. यंदा पाच शाळा बेकायदा जाहीर झाल्या असून त्यात बेलापूर येथील इस्माइल एज्युकेशन ट्रस्टची अल मोमीन स्कूल, आर्टिस्ट व्हिलेज, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टची नेरूळमधील इकरा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), सीवूड, सेक्टर-४०, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, किसननगर नं. ३, ठाण्याचे सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, सेक्टर- ५, घणसोली (न्यायप्रविष्ठ प्रकरण), इलिम फुल गोस्पेल ट्रस्टचे इलिम इंग्लिश स्कूल, आंबेडकर नगर, रबाळे या शाळा बेकायदा आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेने बेकायदा शाळांची यादी जानेवारी-फेब्रुवारीमध्येच प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे; मात्र यंदा यादी उशिरा जाहीर झाल्याने पालक प्रवेश प्रक्रिया करताना याबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
------------------------------------------------------
ापालिकेच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
नवी मुंबई शहरात बेकायदा शाळा सुरू असून अशा शाळांची यादी मनपा जाहीर करते; मात्र या शाळांत आधीच प्रवेश प्रकिया राबवली जाते. त्यानंतर महापालिका यादी जाहीर करत असल्यामुळे विद्यार्थी वर्षभर बेकायदा शाळेत शिक्षण घेत असतात. २०२१ मध्ये तुर्भे स्टोअरमध्ये अशीच एक बेकायदा शाळा महापालिकेने बंद केली होती. त्यामुळे पालिकेने वेळीच यादी प्रसिद्ध केली तर अशा शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्याचे टाळतील.
-----------------------------------------------
शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामामधील घरे खरेदी करून नागरिकांची फसगत होऊ नये, म्हणून अशा बांधकामांवर घर खरेदी करू नये, असे फलक लावण्याचे आदेश महापालिकेचे आहेत. त्याचप्रमाणे शहरातील बेकायदा शाळांबाहेर असे फलक लावल्यास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसगत होणार नाही.
- मंगल घरत, सरचिटणीस, भाजप महिला मोर्चा