रिक्षाचालकांना सौज्यन्याचे धडे

रिक्षाचालकांना सौज्यन्याचे धडे

नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर)ः रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसावा या उद्देशाने कळंबोली वाहतूक शाखेकडून पनवेल परिसरातील रिक्षा थांबे तसेच वर्दळीच्या ठिकाणी जनजागृतीपर उपक्रमातून रिक्षाचालकांची जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने कळंबोली वाहतूक पोलिसांनी पनवेल शहरात ऑटो रिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबवली होती.
कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिर्के तसेच सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या मोहिमेअंतर्गत शेकडो रिक्षांची तपासणी केली. या वेळी मीटरप्रमाणे भाडे नाकारणे, मीटर सील नसणे, मीटर सदोष, रिफ्लेक्टर, ज्यादा प्रवासी, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, भाडे नाकारणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, परवाना नाही इत्यादी कारणांसाठी ही तपासणी मोहीम राबवण्यात आलेली होती. तसेच खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर जवळपास १०० रिक्षा वाहनचालक एकत्र करून त्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व, प्रवाशांशी सौजन्याने वागण्यासंदर्भात, मीटरप्रमाणे भाडे आकारणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
---------------------------------
रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. त्यांनी गणवेष परिधान करावा तसेच मीटरप्रमाणे भाडेआकारणी करून प्रवाशांशी सौजन्याने वागावे; जेणेकरून दंडात्मक कारवाई होणार नाही.
- हरिभाऊ बानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com