missing case
missing case sakal

Mumbai : मात्र दोन तासांनंतरही ते घरी आले नाहीत म्हणून... ; काही तासांत लागला हरवलेल्या आजोबांचा शोध

मुंबादेवी - घरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले ८६ वर्षांचे सूर्यकांत शेडगे आज (ता. २८) सकाळी हरवले होते. याबद्दल त्‍यांच्या मुलासह मित्र परिवाराने जे. जे. मार्ग व भायखळा पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनीही तातडीने सर्व सूत्रे फिरवत अवघ्‍या काही तासांत या आजोबांचा शोध लावत त्‍यांच्या परिवाराकडे सुपूर्द केले. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिंधुदुर्ग येथील आचरा, हिर्लेवाडी येथून १४ तास प्रवास करून सकाळी शेडगे कुटुंब मुंबईत दाखल झाले. सुरेखा शेडगे, सूर्यकांत शेडगे आणि त्यांचा मुलगा सागर हे डोंगरी येथील त्यांच्या घरी पोहचले. घोटभर चहा घेऊन ८६ वर्षांचे आजोबा सूर्यकांत शेडगे हे घराबाहेर गेले.

missing case
Mumbai : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणात भोईवाडा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

त्यांचा नातू कृष्णा आणि मुलगी सरिता यांनी त्यांना कोठे जाताय म्हणून विचारले तर एक फेरफटका मारून येतो असे म्हणाले; मात्र दोन तासांनंतरही ते घरी आले नाहीत म्हणून काळजीने घरातील तसेच विभागातील मित्र परिवाराने जे. जे. मार्ग आणि भायखळा पोलिसांत धाव घेत आमचे आजोबा हरवले असे सांगितले.

असा लागला शोध
भायखळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक चिमाजी आढाव यांनी वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांना माहिती दिली आणि महिला उपनिरीक्षक अरुणा होरे, सुखदेव सानप यांना आदेश देत शोधमोहीम सुरू केली; तर दुसरीकडे जे. जे. मार्गचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ कुलवंत यांनी वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांना हरवलेल्या आजोबांची माहिती देत उपनिरीक्षक मुरलीधर सावंत यांना शोध घेण्यास मार्गदर्शन केले.

missing case
Mumbai : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणात भोईवाडा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

जे. जे. मार्ग आणि भायखळा पोलिसांनी त्यांच्या मोबाईल व्हॅनने शोध मोहीम सुरू केली. आजोबांचे नाव, वय, फोटो सोशल मीडियावरही टाकण्यात आला. ताडवाडी येथील काही युवकांना त्‍यांच्या परिसरात हे आजोबा आढळून आले. त्‍यांनी पोलिसांशी सपर्क केला. भायखळा पोलिसांनी ताडवाडी येथे जाऊन आजोबांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. उपनिरीक्षक अरुणा होरे यांनी नातेवाईकांना फोनवरून कळवले. दरम्‍यान, आपले बाबा सापडल्याचा आनंद त्यांची मुले सागर, सरिता, संगीता आणि स्नेहल यांच्या चेहऱ्यावर झळकला.

missing case
Mumbai : चित्रपट निर्माता जसप्रीत वालियाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; बँकेची फसवणूक केल्याचा आरोप

आठवड्याला एक ते दोन प्रकरणे
पोलिस ठाण्यात वरिष्ठ नागरिक हरवल्याच्या आठवड्यात अशा एकदोन केसेस येतात. आम्ही माहिती घेऊन तात्काळ शोधमोहीम सुरू करतो. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेत नातेवाईकांच्या स्वाधीन करताना एक अवर्णनीय आनंद प्राप्त होतो, असे सांगत महिला उपनिरीक्षक अरुणा होरे यांनी वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत आणि निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस टीमने शोध घेत मोहीम फत्ते केल्याचे समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com