रेशन, पाणी, आरोग्यबाबत जनवादी महिला संघटना महामोर्चा

रेशन, पाणी, आरोग्यबाबत जनवादी महिला संघटना महामोर्चा

ठाणे, ता. २८ : रेशन, पाणी, आरोग्य आदी विषयांवर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महामोर्चा आयोजित करण्यात आला होते. या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले व ठाणे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या मध्यस्थीने शिष्टमंडळाने सोबत सकारात्मक चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्राची हातिवलेकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर जोरदारपणे घोषणाबाजी केल्या. अप्पर जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा जायभाये यांच्या समवेत च्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, पाणीपुरवठा अधिकारी यांच्या चर्चा झाली. या वेळी प्रत्येकाला ५ किलो रेशन मिळेल याची खातरजमा करून त्यासाठी नवीन रेशन कार्डांसाठी कँप लावण्याच्या सूचना देण्यात आली, पावसाळा संपताच मनरेगाची कामे सुरू करणार येणार असल्याचे सांगण्यात आले. हर घर नल योजना सुरू होईपर्यंत टँकरची सोय होणार असल्याचे बैठकीत मान्य करण्यात आली. सर्व रुग्णालयात सर्वेक्षण करावे, अशी सूचना करण्यात आली असून ती मान्य करण्यात आली. रुग्णवाहिका करिता १०८ गाड्या पुरवणार गरोदरपणात देण्यात यावी, अशा मागण्या मंजूर करण्यात आल्या, अशी माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्राची हातिवलेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com