भिवंडीत १८४ अतिधोकादायक इमारती

भिवंडीत १८४ अतिधोकादायक इमारती

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : शहरात दिवसेंदिवस अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. सध्या महापालिका क्षेत्रात १८४ अतिधोकादायक इमारती असून त्यात १३५१ कुटुंबे भीतीच्या छायेत अजूनही राहत आहेत. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी यावर वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भिवंडी शहरात २६७ इमारती या अतिधोकादायक आहेत असे पालिकेच्या दफ्तरी नोंद असले तरी शहरात अतिधोकादायक इमारती आणि घरांची संख्या दुप्पट आहे. त्यापैकी केवळ ८३ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान प्रभाग क्र.१ मध्ये अतिधोकादायक ५३ इमारतींमधील २१ इमारतींचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून इमारती खाली करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर प्रभाग २ मध्ये ५ अतिधोकादायक इमारतींपैकी २ इमारती खाली करण्यात आल्या आहेत. तसेच प्रभाग ३ मध्ये ९० अतिधोकादायक इमारती आहेत. त्यापैकी २७ इमारतींचे पाणी व नळ कनेक्शन तोडून दोन इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रभाग ४ मध्ये ३७ मोडकळीस आलेल्या इमारतींपैकी २३ चे वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आले असून ५ इमारती खाली करण्यात आल्या आहेत. तर प्रभाग ५ मध्ये ८१ इमारतींमधील ४० इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करून इमारती खाली करण्यात आल्या आहेत. या प्रभागात जुन्या भिवंडीचा भाग येत असून या प्रभागात सुमारे १०० ते १५० वर्षाची जुनी घरे च्या जुनी घरे आहेत.
-----------------------------
अजूनही इमारतींमध्ये वास्तव्य
भिवंडी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी धोकादायक, अतिधोकादायक इमारती आणि घरांची पाहणी करून त्यांना नोटीस देण्याचे येते. अशा नोटीसा देऊनही अनेक घरे व इमारतींची वीज आणि पाणी जोडणी खंडित करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजूनही अनेक जण या धोकादायक घरे आणि इमारतींमध्ये राहत आहेत. तसेच कारवाई होत नसल्याने शहरातील अतिधोकादायक घरे आणि इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
.....
महापालिकेच्या पाच विभागांतर्गत एकूण १०७२ मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यापैकी ८०५ धोकादायक इमारती असून २६७ अतिधोकादायक इमारती आहेत. यात ज्या इमारती अत्यंत जीर्ण आहेत, त्या तोडण्यात येतील आणि ज्या दुरुस्ती करण्यायोग्य आहेत, त्यांच्या दुरुस्तीनंतर स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल मालकांना देण्यास सांगितले आहे. तसेच महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व १०७२ धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
- साकीब खरबे, नगर विकास अधिकारी, भिवंडी महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com