दुधातील भेसळीचा गोरखधंदा उघडकीस

दुधातील भेसळीचा गोरखधंदा उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : सागाव सागर्ली परिसरात दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी रविवारी (ता. २८) सकाळी टेम्पो नाका परिसरात पाहणी केली असता एका खोलीत हा सगळा गोरखधंदा होत असल्याची बाब उघडकीस आली. महेश पाटील, सुजीत नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेसळ करणाऱ्या व्यक्तीला पकडून टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दुधात भेसळ केल्याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी रमेश बनपट्टी (वय ४०) याला ताब्यात घेतले आहे.
डोंबिवली ग्रामीण भागातील सागाव सागर्ली परिसरात जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा या इमारतीत दुधात भेसळ होत असल्याची माहिती महेश पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे ५ ला या ठिकाणी जाऊन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. भेसळ करणारा मूळचा हैदराबादचा असून मुंबईतील अंधेरी येथून तो अशाप्रकारे भेसळ करण्यास शिकलेला आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आम्ही अन्न व औषध प्रशासनाशी सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र कोणीही या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही, अशी खंतदेखील महेश पाटील यांनी व्यक्त केली.

---------------

भाड्याने खोली घेऊन भेसळ
टिळकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग पिठे म्हणाले, भेसळप्रकरणी रमेश बनपट्टी याला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पाणी, दूध, ग्लास, प्लास्टिक नरसाळे, कात्री, मेणबत्ती अशा वस्तू आढळून आल्या आहेत. रमेश याने टेम्पो नाका परिसरातील एका इमारतीत रूम भाड्याने घेतली असून तीन महिन्यांपासून तो या ठिकाणी ही भेसळ करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनासदेखील याप्रकरणी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com