३० रुपयांत नाश्ता न देणाऱ्यांवर कारवाई

३० रुपयांत नाश्ता न देणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी प्रवासात नाश्ता, चहा, जेवणासह, स्वच्छतागृहांची सोय व्हावी, यासाठी मार्गावरील काही हाॅटेलांच्या ठिकाणी अधिकृत थांबे दिले आहेत. त्या ठिकाणी हाॅटेलमध्ये प्रवाशांना तिकीट दाखवल्यास सवलतीच्या दरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय केली जाते. उन्हाळी हंगामात प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे यातून हाॅटेल मालकांनासुद्धा चांगली कमाई होते; मात्र काही हाॅटेलमालकांकडून ३० रुपयांत ठरल्याप्रमाणे नाश्ता दिला जात नसल्याबद्दल प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे तक्रारी केल्याने आता अशा हाॅटेलचालकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाच्या थांब्यांवरील हॉटेलमालकाने ३० रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दर्शनी जागेवर त्यासंबंधित माहितीचे फलकसुद्धा लावावा लागतो. मात्र काही ठिकाणी एसटीच्या प्रवाशांना या सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने मार्ग तपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक आणि विभागातील अधिकाऱ्यांनी ३० रुपयांतील नाश्ता दिला जात आहे का आणि जादा दराने नाथजल विक्री होत असेल, तर खातरजमा करावी. तसेच योजनेची अंमलबजावणी होत नसेल, तर हॉटेलमालकाच्या ही बाब निदर्शनास आणून द्यावी, तसेच अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो, त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा, तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (नियोजन आणि पणन) यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com