गळक्या पाण्याच्या टॅंकरमुळे वाहनचालक त्रस्त

गळक्या पाण्याच्या टॅंकरमुळे वाहनचालक त्रस्त

नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : नवीन पनवेल उड्डाणपुलावरून पाण्याची वाहतूक करणाऱ्या टॅंकरचे पाणी रस्त्यावर सांडत असल्याने अनेक दुचाकी चालकांची घसरगुंडी झाल्याचा प्रकार रविवारी (ता. २८) सकाळी घडला. पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असतना टॅंकर चालकांची चांगली कमाई होताना दिसत आहे; परंतु पाण्याचे टँकर हे गळके असल्याने पाणी वाहतूक करताना ते रस्त्यावर पाण्याचा सडा टाकत चालतात. त्यामुळे रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका बसत असल्याची घटना नवीन पनवेल येथील उड्डाणपूलावर घडली. नवीन पनवेल उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे काम नुकतेच झाले आहे. त्यामुळे या गुळगुळीत रस्त्यावर पाणी पडल्याने दुचाकीचालक घसरल्याची घटना घडल्याने अशा टॅंकरचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com