गुरे तस्कारांचा डाव ग्रामस्थांनी उधळला

गुरे तस्कारांचा डाव ग्रामस्थांनी उधळला

मनोर, ता. २८ (बातमीदार) : ग्रामीण भागात गुरे चोरणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरे चोरणाऱ्यांना पकडण्यासाठी ग्रामीण भागात पहाराही दिला जात आहे. अशातच मनोरमध्ये रविवारी (ता. २८) पहाटे ग्रामस्थांनी पाठलाग करून जप्त केलेल्या कारमध्ये दोन बैल आढळून आले. बैलांची तस्करी करणाऱ्या इको कारचा पाठलाग केला असता कार सोडून चालक आणि त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. मनोर पोलिसांनी कारसह दोन बैल ताब्यात घेतले असून संशयित आरोपींविरोधात मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारमधून बैलांची तस्करी होणार असल्याच्या माहितीनुसार ग्रामस्थांनी मनोरच्या बाजारपेठ रस्त्यावर पाळत ठेवली होती. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक संशयित इको कार भरधाव महामार्गाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आल्यानंतर कारचा पाठलाग सुरू करण्यात आला. पाठलाग होत असल्याचे समजल्याने चालकाने डोंगरी भागात कार उभी करून कारचालक आणि त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ग्रामस्थांनी कारची पाहणी केली असता इको कारमध्ये दोन बैलांच्या मानेला आणि पायांना दोरीने घट्ट बांधून दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. मनोर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दोन बैल आणि कार जप्त करून ताब्यात घेतली.

------------

गुंगीचे इंजेक्शन देऊन गाडीत कोंबले
कारमध्ये जनावरांना गुंगीचे औषध देऊन वेदना होतील अशा पद्धतीने बेकायदा वाहतूक करण्यात आली होती. कारमध्ये बैलांना उभे राहता येत नसल्यामुळे गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांना आडवे पाडून मानेला व पायांना दोरीने घट्ट बांधण्यात आले होते. अशाप्रकारची अमानुष वाहतूक केल्यामुळे तसेच जनावरांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही बैलांना सकवार येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com