चित्रपट निर्माता वालियाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

चित्रपट निर्माता वालियाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई, ता. २८ : चित्रपटासाठी कर्ज घेऊन आयडीबीआय बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने चित्रपट निर्माता जसप्रीत वालिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘लम्हा’, ‘हॅलो ब्रदर’, ‘एक अजनबी’, ‘प्यार किया तो डरना क्या’ इत्यादी सिनेमांची निर्मिती वालिया यांनी केली आहे. वालियांचे चार्टर्ड अकाऊंटंट स्टॅनी सलढाणा यांनी बँकेकडून कर्ज मिळावे, म्हणून बनावट प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेने लेखी तक्रार करून सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जून २००८ मध्ये अभिनेता संजय दत्त, बिपाशा बासू आणि कुणाल कपूर अशी स्टारकास्ट असलेल्या ‘लम्हा’ सिनेमाची निर्मिती करण्यासाठी वालिया यांच्या जी. एस. एन्टरटेन्मेंट कंपनीने आयडीबीआय बँकेकडून परदेशी चलनात दहा कोटींचे कर्ज घेतले होते. चित्रपट मे २००९ मध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला बराच विलंब झाला. चित्रपटामध्ये आपले पैसे अडकल्याने बँकेनेच तो प्रदर्शित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. कर्जासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे बँकेने कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट केले. त्यामधून अनेक धक्कादायक गोष्टी बँकेच्या निदर्शनास आल्या.

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका
सिनेमाला अधिकाधिक पैसे मिळावेत म्हणून सिनेमाच्या निर्मितीचा खर्चही फुगवून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.  निर्मात्याला आयडीबीआय बँकेकडून कर्जापोटी जी रक्कम मिळाली, त्यातील पैसे त्याने अन्य बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरले. काही पैसे निर्मात्याच्याच अन्य खात्यात वळवून तेच पैसे ‘लम्हा’ सिनेमासाठी वापरण्यात आल्याचे दाखवण्यात आले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. फॉरेन्सिक ऑडिट करतेवेळी कंपनीला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वारंवार विचारणा केली. मात्र, कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर निर्मात्याच्या कंपनीचे खाते ३१ मार्च २०२१ रोजी आर्थिक गुन्हेगार खाते म्हणून घोषित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com