Fri, Sept 29, 2023

दोन हजारांच्या बनावट नोटा बदलणाऱ्यास अटक
दोन हजारांच्या बनावट नोटा बदलणाऱ्यास अटक
Published on : 28 May 2023, 4:07 am
मुंबई, ता. २८ : मुंबईतील ताडदेव परिसरातील एका खासगी बँकेत २००० रुपयांच्या १० बनावट नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी (ता. २६) अटक करण्यात आली. नवीद अशफाक शेख असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. शेख मोबाईलच्या दुकानात कार्यरत आहे. बँकेत नोटा बदलताना नोटा मोजणाऱ्या मशीनमध्ये बनावट नोटा आढळून आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी नोटांबद्दल आरोपीला माहिती विचारली असता तो समाधानकरक उत्तरे न देऊ शकल्याने बँक कर्मचाऱ्यांनी ताडदेव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली.