वेटरने केला वृद्धाचा खून

वेटरने केला वृद्धाचा खून

ठाणे, ता. २८ (वार्ताहर) : स्टेशन रोडवरील प्रिन्स हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाचा हॉटेलच्या वेटरने तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करून पोबारा केल्याची माहिती उघडकीस आली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काराभाई रामभाई सुवा असे मृताचे नाव आहे. काराभाई हे मूळचे गुजरात राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. ते ठाणे स्टेशन रोडवरील प्रिन्स हॉटेलच्या ३०३ नंबरच्या रूमध्ये राहत असल्याची माहिती हॉटेलचा स्वागत कक्षातील कर्मचारी दिलीपकुमार भरतकुमार पल्लई याने दिली. त्याच्या फिर्यादीवरून ठाणे नगर पोलिसांनी वेटर राजन शर्मा याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हॉटेलमध्ये काम करणारा आरोपी वेटर राजन शर्मा याने कोणत्या तरी कारणावरून त्यांच्या गळ्यावर, चेहऱ्यावर हत्याराने ठिकठिकाणी टोचून ठार मारले. खुनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. ठाणे नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com