Sun, October 1, 2023

जयंत देसले यांना समाज कर्मयोगी पुरस्कार
जयंत देसले यांना समाज कर्मयोगी पुरस्कार
Published on : 29 May 2023, 10:53 am
वसई (बातमीदार) : बोलीभाषा लेखक जयंत पांडुरंग देसले यांना सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या वतीने समाज कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बोईसर पूर्वेतील नागझरी येथील शिवमंदिर मैदानावर रविवारी (ता. २८) ज्ञातिहितवर्धक मंडळाचे १०९ वे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ‘सकाळ’चे बोईसर बातमीदार सुमित पाटील यांनी आदर्श पत्रकारिता पारितोषिक पुरस्काराने गौरवण्यात आले.