जलतरणासाठी सीबीडीला धाव

जलतरणासाठी सीबीडीला धाव

खारघर, ता. २९ (बातमीदार) : निसर्गरम्य परिसर म्हणून ओळख असलेल्या खारघर शहरात मध्यम तसेच उच्चवर्गीयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. सध्यस्थितीत शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे, पण असे असताना एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर अशी ओळख असलेल्या खारघरमध्ये एकही जलतरण तलाव नसल्याने मुलांना पोहण्याचे धडे घेण्यासाठी सीबीडीला जावे लागत आहे.
उन्हाळी सुट्टी लागल्याने पालकांचा मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी कल असतो. शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले जलतरणाचे प्रशिक्षण मुलांना मिळावे, याकडे अनेकांचा प्रयत्न असतो, पण खारघर परिसरात सार्वजनिक तसेच खासगी असा एकही तरण तलाव नसल्यामुळे पालकांना मुलांना पोहण्याचे धडे देण्यासाठी दररोज शंभर रुपये खर्च करून सीबीडीमधील एका खासगी क्लबच्या तरणतलावात जावे लागत आहे.
------------------------------
महिन्याला तीन हजारांचा भुर्दंड
खारघर शहराची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामस्थ बेलपाडा तसेच घरकुल येथील तलावाचा उपयोग करीत होते; मात्र शहराची निर्मिती झाल्यावर वसाहतीमधील रहिवासी या तलावात निर्माल्य टाकत आहेत. त्यामुळे तलावाची दुरवस्था झाली असून खारघरमधील मुलांना सीबीडीतील खासगी तरणतलावामध्ये मासिक तीन हजार रुपये शुल्क भरून पोहण्याचे धडे घ्यावे लागत आहेत.
----------------------------------
खारघर शहरात एकही तरणतलाव नसणे ही खरी शोकांतिका आहे. आजच्या घडीला खारघर शहर सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे या शहरात तरणतलावाची सुविधा असणे गरजेचे आहे.
- केशरीनाथ पाटील, पदाधिकारी, मनसे
--------------------------------
पूर्वी गावाशेजारी विहीर तसेच खाडी असायची. त्यामुळे मुले पोहण्यासाठी जात होती; मात्र आता बांधकामामुळे विहिरी, खाडीचे अस्तित्वच राहिले नसल्यामुळे पोहणे बंद झाले आहे.
- नरेश तोडेकर, ग्रामस्थ, कोपरा गाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com