नालेसफाईबाबत नागरिक नाराज

नालेसफाईबाबत नागरिक नाराज

कांदिवली, ता. २९ (बातमीदार) ः कांदिवली परिसरातील नालेसफाईबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. उपनगरातील नालेसफाईबाबत पालिकेने अनेक दावे केले असले तरी हे काम अद्यापही अपूर्णच असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. महिंद्रा कंपनीसमोरून वाहणाऱ्या नाल्‍याची सफाई करताना त्‍यातून झाडाच्या फांद्या, प्लास्‍टिक जरी काढण्यात आले असले, तरीही चिखल व दगड धोंडे तसेच राहिले असून यामुळे नाल्‍याची खोली कमी झाल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
कांदिवली पूर्वेला नॅशनल पार्कच्या डोंगराळ भागातून दामू नगरमधून खालच्या दिशेला वाहत येणारा नाला महिंद्र कंपनीच्या समोरून हनुमान नगर विभागातून पुढे जातो. दोन आठवड्यांपूर्वी जेसीबीच्या साह्याने नालेसफाई केली गेली. या वेळी नाल्‍यातील प्लास्‍टिक, झाडाच्या फांद्या काढण्यात आल्‍या; मात्र हा नाला मोठमोठे दगड आणि चिखल-मातीने भरला आहे. २६ जुलैच्या महापुरात याच नाल्यामुळे महिंद्र कंपनी, समतानगर, सिंग इस्टेट आणि हनुमान नगर पाण्यात गेले होते. त्‍यामुळे या नाल्‍यातील दगड व चिखल काढून नाल्‍याची खोली वाढवण्याची गरज नागरिक व्यक्‍त करत आहेत.

पदपथांवर कचरा
नालेसफाई केल्‍यानंतर त्यातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या काढून पदपथावर ठेवण्यात आल्या आहेत. त्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वेळीच ते उचलले न गेल्‍यास नागरिकांच्या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे.

वरवरचा कचरा काढून नालेसफाई झाल्याचे समाधान पालिका अधिकारी व्यक्‍त करत आहेत. प्रत्यक्ष पाहणी केल्यास खोटेपणा उघड होईल. नाल्यात पाण्यापेक्षा दगडगोटेच जास्त आहेत.
- गणेश पावडे, सामाजिक कार्यकर्ते

नालेसफाई झाली आहे. कुठे काही राहिले असल्यास ठेकेदाराला सांगून ते पूर्ण करण्यात येईल.
- पंकज जाधव, अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com