अपहरण, मारहाणीच्या गुन्ह्यांत वाढ

अपहरण, मारहाणीच्या गुन्ह्यांत वाढ

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालय स्थापन होऊन आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुक्तालयाच्या विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी ९० टक्के गुन्हे उघडकीस करण्यात पोलिस पथकांना यश आले आहेत. विशेष म्हणजे २०२२ या वर्षात दाखल झालेले खुनाचे सर्व गुन्ह्यांचा तपास यशस्वी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र आयुक्तालयाच्या परिसरात अपहरण आणि मारहाणीच्या गुन्हा २०२२ मध्ये वाढ झाल्याचे समोर येत आहे.

मिरा-भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील विविध ठाण्यात २०२१ या वर्षात खुनाचे एकंदर ५२ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ४७ गुन्हे पोलिसांनी यशस्वी तपास करून उघडकीस आणले. त्याचे प्रमाण ९० टक्के होते. तर २०२२ मध्ये खुनाचे प्रमाण घटले असून ३८ गुन्हे दाखल झाले होते. ते सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले. त्याव्यतिरिक्त विनयभंग, अपहरण, मारहाण या गुन्ह्यांचा दोन्ही वर्षांत ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी तपास झाला आहे.

पहिल्या वर्षात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबद्दल उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाकडून प्रशासनामध्ये बदल आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर नागरिकांशी सुसंवाद साधण्यात आला. गेल्या वर्षभरामध्ये उपायुक्त अविनाश अंबुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक सशक्त गुन्हे शाखा आयुक्तालयात स्थापन करण्यात आली. त्यात तीन डिटेक्शन युनिट, सेंट्रल डिटेक्शन युनिटचा समवेश आहे.

२०२१ मधील गुन्ह्यांची आकडेवारी
वर्गवारी दाखल उघड टक्के
खून ५२ ४७ ९०
विनयभंग ४१४ ४०२ ९७
अपहरण ५०२ ४५१ ९०
मारहाण ९५२ ९४० ९९
चेन चोरी ११३ ७५ ६६
जबरी चोरी २०२ १४१ ७०

२०२२ मधील गुन्ह्यांचे प्रमाण
वर्गवारी दाखल उघड टक्के
खून ३८ ३८ १००
विनयभंग ५४६ ५२४ ९६
अपहरण ६२१ ५५२ ८९
मारहाण १०५४ १०३८ ९८
साखळी चोरी ४१ २३ ५६
जबरी चोरी २०१ १४४ ७२

महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याची डिटेक्शन पथक योग्यरितीने काम करत आहेत. त्यांच्यामध्ये सहकार्य आणि स्पर्धा हे दोन्ही चांगल्या पद्धतीने होत आहेत. यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासंदर्भात चांगले काम झाले आहे.
- मधुकर पांडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com