दुचाकी चालकांना हेल्मेटची सक्ती

दुचाकी चालकांना हेल्मेटची सक्ती

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : दुचाकीस्वारासह त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, असे असताना शासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये चालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने मोटार वाहन अधिनियम १९४ (क) नुसार नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.
वाहन अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकांचे झाले आहेत. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १२८ नुसार दुचाकीस्वार तसेच त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्याला हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, हेल्मेटसक्तीचे आदेश असताना आजही अनेक जण विनाहेल्मेट प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे दुचाकीधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून नवी मुंबईतील सर्व शासकीय, खासगी कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी-अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच संस्थेच्या परिसरात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यास मज्जाव करण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
-----------------------------------
वाहनचालकांना प्रवेशबंदी
नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १९४ (क) अंतर्गत संस्थेला जबाबदार धरून संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शासकीय तसेच खासगी कार्यालय, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांना परिसरात प्रवेशबंदी केली आहे.
-----------------------------------------------
नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये हेल्मेटसक्तीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेशबंदी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
- हेमांगिनी पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com