आता ठाण्यातही सुरू होणार अम्युझमेंट आणि स्नो पार्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता ठाण्यातही सुरू होणार अम्युझमेंट आणि स्नो पार्क
आता ठाण्यातही सुरू होणार अम्युझमेंट आणि स्नो पार्क

आता ठाण्यातही सुरू होणार अम्युझमेंट आणि स्नो पार्क

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : बर्फाच्या नुसत्या दर्शनाने चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात चमक येते. या बर्फाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण शिमला, मनाली, काश्मीरसह परदेशात फिरण्यासाठी जातात, पण या बर्फात खेळण्याचे ठाणेकरांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने कोलशेत येथील पार्कसाठी आरक्षित भूखंडावर अम्युझमेंट पार्क आणि स्नो पार्क उभारण्याच्या प्रक्रियेच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
उष्णतेपासून लांब थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा बेत अनेक जण आखत असतात. तसेच अनेकदा उन्हाळ्याच्या कालावधीत बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मनाली, काश्मीर यांसारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असते. हीच बाब लक्षात घेऊन आपल्या घरापासून जवळच बर्फवृष्टीचा आनंद नागरिकांना व बच्चे कंपनीला लुटता यावा यासाठी मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ ठाणे पालिका प्रशासनानेदेखील अम्युझमेंट पार्क व स्नो पार्क प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाण्यातील कोलशेत भागात पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेवर हे अम्युझमेन्ट पार्क व स्नो पार्क प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात जुलै २०१७ मध्ये महासभेत ठराव करण्यात आला होता. त्यास मार्च २०२३ रोजी आयुक्तांनी मान्यता दिली. त्यामुळे आता पुन्हा नव्याने हा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. त्यानुसार आता या ठिकाणी स्नो पार्कबरोबर अम्युझमेंट पार्कची भर घालण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार आता एक लाख ५० हजार चौरस मीटर क्षेत्रावर अम्युझमेंट पार्क आणि स्नो पार्क उभारले जाणार आहे. यासाठी पूर्वीची आरक्षित जागा आणि एचसीएमटीआर क्षेत्र त्यासाठी एकत्रित करण्यात आले आहे. या माध्यमातून ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजनाचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून संपूर्ण आराखडे, नकाशे, अंदाजे खर्च, प्रकल्प कालावधी, निविदा प्रक्रिया आदींसह इतर कामे करून घेतली जाणार आहेत. त्यासाठी सल्लागाराला एक कोटी १८ लाख ९६ हजार ५५४ रुपये दिले जाणार आहेत, परंतु ही रक्कमसुद्धा विकासकाकडून दिली जाणार आहे.
..................................

* स्नो-पार्क :
- ५०० लोकांची क्षमता
- मुख्य स्नो पार्ककरिता चेंजिंग रूम्स व कूलिंग क्षेत्र सोव्हेनियर स्टोअर्स.
- डिजिटल व फोटोशॉप, फ्रेश रूम्स, टिकेटिंग एरिया असणार आहे.
.....................
* अॅम्युझमेंट पार्क :
या पार्कमध्ये आठ ते दहा ड्राय राईड असणार आहेत. यात कॉफी कप, सन अॅण्ड मून, फॉमिली रोलर कोस्टर, सिक्स रिंग रोलर कोस्टर, कोरोजील, स्टिंग टॉवर ४५ मी. ड्रॉप टॉवर. - डिस्को कोस्टर जायंट व्हील, पॅन्ड्युलम आणि फॅण्टसी प्लॅनेट आदींचा समावेश असेल.
..................................
इतर सुविधा व आकर्षण :
९. डी. सिनेमा, एच. डी. सिनेमा, हॉरर हाऊस, मोटर मेज, इको पार्क व नेचर ट्रेल, फूड पार्क, डिपार्टमेन्टल स्टोअर्स, एक्झिबिशन हॉल.