पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला
पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील अकलोली कुंड या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून मित्रांच्या मदतीने एका तरुणावर जीवेघेणा हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना नुकतीच गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रणय गायकर असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, की अकलोली कुंड गावात राहणारा प्रणय गायकर हा रात्रीच्या सुमारास अंघोळीसाठी कुंडावर आला होता. त्यानंतर काही वेळाने वज्रेश्वरी येथील काही तरुणांनी तेथे येऊन जुने कारण उकरून प्रणयशी वाद घालण्यास सुरुवात केली. तू मला शिवीगाळ का करतोस? म्हणून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वज्रेश्वरी येथील साहिल खेडेकर, हरी धनसिंग नेपाळी, कृषीकेश भोसले, विराज क्षीरसागर यांच्यासह इतर दहाबारा जणांनी दुचाकीवरून प्रणयला एकटे गाठले. रात्री बारा वाजता रस्त्यावर त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. छातीवर मार बसल्याने त्याच्या फुप्फुस, हृदयाला इजा झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व हाणामारीचे चित्रीकरण परिसरात सर्वत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके करत आहेत.