ऑनलाईन गेमद्वारे लाखोंची फसवणूक

ऑनलाईन गेमद्वारे लाखोंची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून दोघा भामट्यांनी लाखोंची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील गोळवली गावातील एका नोकरदारासह इतर बॅंक धारकांची फसवणूक झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात चांदनी सिंह व मोहित लालवाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळवली येथे राहणारे धीरेश पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चांदणी आणि मोहित यांनी धीरेश तसेच इतर साक्षीदारांच्या नावे आयसीआयसीआय बँकेत नवीन खाते उघडले. या बॅंक खात्याला दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक जोडला. तक्रारदार आणि साक्षीदार यांना काही कळू न देता आरोपींनी ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल केली. धीरेश यांना हा प्रकार समजताच त्यांनी बँकेतून या प्रकाराची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना आपल्या व इतरांच्या खात्यांमधून अशाप्रकारे लाखो रुपयांची उलाढाल आरोपींनी केल्याचे समजले. आपल्या अपरोक्ष बँक खात्याचा नियमबाह्य वापर केल्याबद्दल धीरेश यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com