मित्रानेच केली मैत्रीणीच्या घरात चोरी

मित्रानेच केली मैत्रीणीच्या घरात चोरी

पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : नवीन पनवेलमध्ये राहणाऱ्या विवाहित तरुणीच्या घरी जेवण्याच्या बहाण्याने गेलेल्या मित्राने तरुणीच्या घरातील दागिने व मोबाईल फोनची चोरी करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवनाथ मालकर असे या चोरट्या मित्राचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार आलिना शेख (वय २१) ही तरुणी नवीन पनवेलमध्ये पतीसह राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी अलिनाचा मित्र नवनाथ मालकर याने तिच्या मोबाईलवर फोन करून जेवणासंदर्भात विचारपूस केली होती. त्यामुळे आलिनाने त्याला आपल्या घरी जेवणासाठी बोलावून घेतले होते. नवनाथ आलिनाच्या घरी जेवण्यासाठी गेल्यानंतर १२ वाजता सर्वजण झोपी गेले. याचदरम्यान नवनाथ याने आलिनाच्या कपाटातील सोन्याची चेन, कानातील रिंग व ३५ हजारांची रोख रक्कम व तिच्या मोबाईल फोनची चोरी केली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आलिनाचा पती कामावरून घरी आल्यानंतर नवनाथने आलिनाच्या घरातून पलायन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com