तडीपार गुंडाला ठाण्यात अटक

तडीपार गुंडाला ठाण्यात अटक

ठाणे, ता. २९ (वार्ताहर) : लोकमान्य परिसरात राहणाऱ्या व हद्दपार केलेल्या गुंड समीर ऊर्फ एस. पी. बळीराम पाटील (वय २९) याला वर्तकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी समीर याला २ जून २०२२ रोजी ठाण्याच्या महसुली हद्दीतून दोन वर्षांकरिता ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व रायगड हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी समीर हा लपून ठाण्यातच वास्तव्य करीत होता. २७ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाला आरोपी समीर उर्फ एस. पी. हा रुणवाल प्लाझासमोर, वर्तकनगर येथे आढळला. वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com