कांदिवलीतील गोळीबारप्रकरणी मारेकर्‍याला उत्तरप्रदेशातून अटक

कांदिवलीतील गोळीबारप्रकरणी मारेकर्‍याला उत्तरप्रदेशातून अटक

कांदिवलीतील हत्येप्रकरणी
मारेकऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक

अंधेरी, ता. २९ (बातमीदार) ः कांदिवलीतील गोळीबारप्रकरणी रोहित पाल नावाच्या मुख्य मारेकऱ्याला पोलिसांनी सोमवारी (ता. २९) उत्तर प्रदेशातून अटक केली. रोहितला रात्री उशिरा उत्तर प्रदेशहून मुंबईत आणण्यात आले.
मनोजसिंह कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहत होते. रविवारी सकाळी त्यांची हत्या करण्यात आली होती. कांदिवली पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. रोहित पाल गोळीबारानंतर पवन एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होता. कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला प्रयागराज स्थानकातून ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com