बस थांब्यावर प्रवाशांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस थांब्यावर प्रवाशांचे हाल
बस थांब्यावर प्रवाशांचे हाल

बस थांब्यावर प्रवाशांचे हाल

sakal_logo
By

नेरूळ, ता. ३० (बातमीदार)ः नेरूळ सेक्टर २८ येथील श्री गणेश सोसायटीसमोरील बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे; तर सीवूड्स सेक्टर ४२ येथील बस थांबा परिवहन विभागाने हटवला असल्याने उन्हात उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
नवी मुंबई महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा कार्यरत आहे. ठिकठिकाणी परिवहन उपक्रमाने प्रवाशांसाठी बस निवारा शेडची उभारणी केली आहे; मात्र नेरूळमध्ये सेक्टर २८ येथे नेरूळ स्टेशनकडे जाणाऱ्या बस प्रवासासाठी अद्यापही बस निवारा शेडची निर्मिती करण्यात आलेली नाही. या मार्गावरून बस क्रमांक १८, २०, २२, १५ आणि बेस्टची बस क्रमांक ५०२ सातत्याने सुरू असते; मात्र प्रवाशांसाठी शेड कित्येक वर्षांपासून अस्तित्वात नसल्याने कडक उन्हात तसेच भरपावसात बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे नवी मुंबई मनपा परिवहन विभागाने तातडीने येथे निवारा शेड उभारावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
-----------------------------------------------------
नेरूळ सेक्टर २८ मध्ये बससाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेक वेळा तासन् तास उभे राहिल्यामुळे विशेषतः महिला तसेच ज्येष्ठांना त्रास होत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने तातडीने लक्ष घालून निवारा शेड उभारावी.
- कुसुम गाडेकर, प्रवासी
---------------------------------
नवी मुंबई मनपा परिवहन विभागाकडून बस निवारा शेड बांधणी साहित्याची निविदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नेरूळ सेक्टर २८ येथील पाहणी करून त्या ठिकाणी पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- योगेश कडुसकर, व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन विभाग