दिवा स्टेशन परिसरात नवीन शौचालय

दिवा स्टेशन परिसरात नवीन शौचालय

दिवा, ता. ३० (बातमीदार) : रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. विशेषतः महिलावर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. ठाणे महापालिकेतर्फे दिवा विभागात इतर ठिकाणी शौचालय असले, तरी नवीन ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे ते उभारणे महापालिकेला शक्य होत नव्हते. नुकत्याच झालेल्या रस्तारुंदीकरणामुळे तयार झालेल्या नवीन जागेत दिवेकर नागरिकांसाठी शौचालय सार्वजनिक शौचालय उभारावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमहापौर रमाकांत मढवी व इतर नगरसेवकांच्या प्रयत्नाने नवीन शौचालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अखेर लहुजी साळवे सामाजिक संस्था व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे सार्वजनिक शौचालय उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर अखेर दिवा स्टेशन रोडवर सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्‌घाटन नुकतेच रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com