समाजासाठी महिलांचे कार्य प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजासाठी महिलांचे कार्य प्रेरणादायी
समाजासाठी महिलांचे कार्य प्रेरणादायी

समाजासाठी महिलांचे कार्य प्रेरणादायी

sakal_logo
By

वसई, ता. ३१ (बातमीदार) : आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. समाजाला नवीन विचार देताना अर्थकारणालाही मदत होत आहे, हे कौतुकास्पद आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्‍गार नन्हे हाथ फाऊंडेशनचे संस्थापक संजय वैष्णव यांनी काढले.

नन्हे हाथ फाऊंडेशनच्या वतीने वसई पश्चिम दिवाणमान येथील सेंट पीटर्स महाविद्यालय सभागृहात प्रेरणादायी महिला, तसेच समाजसेवकांना पुरस्कार देण्यात आला. समाजसेवा व महिलांच्या हक्काचे महत्त्व या विषयावर संजय वैष्णव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ब्लॉगर व्रृत्ती खवानी, समाजसेविका सिंथिआ बापतिस्ता, अभिनेत्री सुप्रिया अरोरा, आर्फ फाऊंडेशनच्या संस्थापक सिमरन वलिआ आदींना प्रेरणादायक स्त्री पुरस्कार, तर समाजसेवेसाठी संत पीटर्स महाविद्यालय, महफूज राईन, लिस्बोन फराओ, न्यू लाईफ फाऊंडेशन आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सेजल शाह यांनी स्त्रियांच्या स्वरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी पुढील काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली, तर फाऊंडेशनचे सह संस्थापक ललित चौहान, प्रकाश वैष्णव यांनी वृक्षसंवर्धन मोहिमेचा निर्धार केला.