Sun, October 1, 2023

मुंब्र्यात महिलेचा खून
मुंब्र्यात महिलेचा खून
Published on : 30 May 2023, 12:01 pm
कळवा, ता. ३० (बातमीदार) : मुंब्रा रेतीबंदर येथील गणेश विसर्जन घाटाजवळ मोकळ्या जागेत २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर महिलेचा मृतदेह प्लास्टिक गोणीत आढळल्याची घटना सोमवारी (ता. २९) दुपारी उघडकीस आली. महिलेचा कपड्याने गळा दाबून तिचा खून करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.