अवघ्या २४ तासांत दोन खुनांचा उलगडा

अवघ्या २४ तासांत दोन खुनांचा उलगडा

ठाणे, ता. ३० (वार्ताहर) : राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आकस्मिक मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या समांतर चौकशीत संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या राहुल ऊर्फ टायसन जयराम जैस्वर (वय २७) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली. तसेच हिललाईन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने जांकिदेवी नगर, शास्त्रीनगर येथून अटक केली. आरोपी दिनेश राजेंद्र कवठणकर (वय २२) याची चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. पोलिस पथकाने अवघ्या २४ तासांत राबोडी आणि हिललाईन पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी पकडून गुन्ह्यांची यशस्वी उकल केली.
राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून डोक्यात व तोंडावर सिमेंटच्या पेव्हरब्लॅकने मारहाण करून अशोक खरपत राजभर (वय ४०, रा. नावान्वी चाळ, हरिदासनगर, वर्तकनगर ठाणे) याचा खून करून आरोपीने पोबारा केला होता. राबोडी पोलिस आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पोलिस पथकाने गुप्त महितीद्वारे २६ मे २०२३ रोजी राहुल ऊर्फ टायसन जयराम जैस्वार याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर राबोडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत आरोपी दिनेश राजेंद्र कवठणकर (वय २२, रा. वीर तानाजीनगर, उल्हासनगर) याने हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा करून पोबारा केला होता. हा गुन्हा २७ मे २०२३ रोजी दाखल करण्यात आला. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा मागोवा काढत माहितीच्या आधारावर सापळा रचून शिताफीने अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com